
अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.)
जिल्हा परिषद,पंचायत विभागाच्या वतीने सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठी २८ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सीईओ संजिता महापात्र यांच्या उपस्थितीत हा सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला.
दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी १४ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. संबंधित निवड समितीच्या बैठकीत विविध निकषांच्या आधारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीतील पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले आहे, यावेळी अतिरिक्त सीईओ विनय ठमके, प्रकल्प अधिकारी प्रिती देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, कृषी अधिकारी मल्ला तोडकर, बाळासाहेब रायबोले, गटविकास अधिकारी प्रफुल्ल बोरखडे, भातकुलीचे बीडीओ तुषार दांडगे, साहाय्यक बीडीओ सुनील गवई, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष कमलाकर वनवे, आशिष भागवत आदींची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत दरम्यान, या उपक्रमामुळे अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळून ग्रामीण विकास कामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा सीईओ संजिता महापात्र यांनी व्यक्त केली.
२०२४-२५ साठी निवड झालेले अधिकारी
मनीषा घवळे (चांदूर बाजार), वैजंतीमाला आहे (धामणगाव रेल्वे), प्रफुल्ल कडू (यरूड), ऋषिकेश रहाटे (अचलपूर), नीलेश उईके (चिखलदरा), धर्मेंद्र ठाकरे (चांदूर रेल्वे), प्रेमलाल धिकार (धारणी), अमोल टाले (तिवसा), स्वाती कांडलकर (नांदगाव खंडेश्वर), विलास यादव (दर्यापूर), ललीत बैलमारे (अमरावती), आशिष अंबाडकर (भातकुली), विनोद वाठोडकर (अंजनगाव सुर्जी) व सागर भातकुलकर (मोर्शी)
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी