
सोलापूर, 02 एप्रिल, (हिं.स.)। अक्कलकोट ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यांच्या पवित्र रथोत्सव यात्रेत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने भाविकांनी सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण शहर भक्तीरसात रंगून गेले.
रथोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून अक्कलकोटच्या समृद्ध परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. यात्रेनिमित्त विविध भागांतून आलेल्या भाविक, नंदीध्वज मानकरी व भक्तगणांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यात्रेत सहभागी होत श्री मल्लिकार्जुनांचे दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच अन्नछत्र मंडळाचे कार्याध्यक्ष अमोलराजे भोसले, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.रथोत्सवाच्या निमित्ताने शहरात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला तसेच, यात्रा ही एकोप्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी परंपर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड