अंबाजोगाई कृषि महाविद्यालय वसतिगृहासाठी जवळपास ४ कोटी मंजूर
बीड, 02 एप्रिल, (हिं.स.) - अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न आता कायमचा सुटणार असून वसतिगृह इमारतीच्या दुसऱ्या मजल्यासाठी शासनाने ३ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा
अंबाजोगाई कृषि महाविद्यालय वसतिगृहासाठी जवळपास ४ कोटी मंजूर


बीड, 02 एप्रिल, (हिं.स.) - अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न आता कायमचा सुटणार असून वसतिगृह इमारतीच्या दुसऱ्या मजल्यासाठी शासनाने ३ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कामासाठी राज्य शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या २० कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून हा महत्त्वाचा वाटा अंबाजोगाईला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या 'ऍग्रिस्टॅक' योजनेच्या अर्थसहाय्यातून ही तरतूद करण्यात आली असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. आमदार मुंदडा यांनी याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांचे आभार मानले असून या निर्णयामुळे अंबाजोगाईच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande