रत्नागिरी : पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे चरित्र आता हिंदीत
रत्नागिरी, 2 एप्रिल, (हिं. स.) : श्रीक्षेत्र पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचे हिंदीतील चरित्र निवृत्त प्राचार्य सीताराम पाटील यांनी लिहिले असून त्याचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. पावस
स्वामी स्वरूपानंदांच्या हिंदी चरित्राचे प्रकाशन


रत्नागिरी, 2 एप्रिल, (हिं. स.) : श्रीक्षेत्र पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचे हिंदीतील चरित्र निवृत्त प्राचार्य सीताराम पाटील यांनी लिहिले असून त्याचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले.

पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य सीताराम पाटील यांनी पाँवस के कर्मयोगी संत स्वामी स्वरूपानंद हे हिंदीतील पुस्तक लिहिले आहे. स्वामींविषयीचे हे हिंदीतील पहिलेच चरित्र आहे. श्री. कर्णिक यांनी हिंदी चरित्रलेखनाची माहिती सीताराम पाटील यांच्याकडून घेतली आणि मराठी साहित्य इतर भाषांमध्येही प्रकाशित झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसे झाले, तरच देशभर त्यांचा प्रसार होईल. तुम्ही लिहीत राहा, असा आशीर्वादही सीताराम पाटील यांना मधुभाईंनी दिला.

कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी प्रास्ताविक करून संस्थेचा इतिहास व पुढील उपक्रमांची माहिती दिली. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी सांगितले की कोकणातील नवोदित लेखकांना कोमसाप ही हक्काचे व्यासपीठ देणारी संस्था बनली आहे, याचा आनंद होत आहे.

यावेळी कार्याध्यक्ष प्रा प्रदीप ढवळ, विश्वस्त एल. बी. पाटील, प्रकाश दळवी यांनीही आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी रत्नागिरी तालुका कोमसाप अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, सदस्य विनायक हातखंबकर, दीपक राऊत, नित्यानंद दळवी, संदीप डोंगरे, पनवेलहून स्वरूप पाटील, रूपाली पाटील, नील पाटील, पुण्याहून संग्रामसिंह पाटील, रत्नागिरीतून संजय वैशंपायन, बबन आंबेकर, मनुश्री दळवी, सौ. लक्ष्मी पाटील, विनायक चव्हाण, मुख्याध्यापक भगवान मोटे, मुख्याध्यापक सदाशिव चौगले, उद्योजक सुहास पाथरे, डॉ दिलीप पाखरे, तसेच सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, पालघर, ठाणे, येथून साहित्यिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande