
लातूर, 02 एप्रिल, (हिं.स.)। प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी लातूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी लातूरच्या वतीने भव्य स्वरूपाची इंग्लिश महागुरू परीक्षा रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा ही दोन गटात घेण्यात येत असून सिनियर व ज्युनियर अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा परीक्षा होईल. सकाळी ८ ते १० या वेळेत सिनियर गटाची तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ज्युनिअर साठी परीक्षा होणार आहे.
सदर परीक्षा ही संपूर्ण इंग्रजीच्या व्याकरणावर आधारित असणार आहे. विद्यार्थ्यांची तयारी या परीक्षेच्या माध्यमातून सर्व पाल्यांना आणि पालकांना सहज लक्षात येईल यासाठी अतिशय मोठ्या स्वरूपात मागील वर्षीही इंग्लिश महागुरु ग्रॅमर स्पर्धा परीक्षा आयोजित केली गेली होती या परीक्षेसाठी जिल्हाभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता याही वर्षी ही परीक्षा कधी होईल यासाठी अनेक विद्यार्थ्यांच्याकडून व पालकांच्या कडून विचारपूस होत आहे म्हणूनच ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने दिनांक ५ एप्रिल रोजी पुन्हा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वरूपात ही स्पर्धा
परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून इंग्रजी विषयात आपल्या प्रतिभेला उंचविणारी पिढी घडणार असून या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने करावे. सहभाग नोंदवावा असे आवाहन अकॅडमीचे संचालक प्रा. सच्चीदानंद ढगे आणि प्रा. विवेकानंद ढगे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेला पुन्हा एकदा संजीवनी मिळवून देण्यासाठी लातूर आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयाला मध्यवर्ती ठेऊन सदरील परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या स्पर्धेचा उद्देश म्हणजे इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास व त्याचे मूल्यमापन करता यावे. १०० गुणांची असणारी परीक्षा ही (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) स्वरूपात होणार आहे. यामध् सिनिअर महागुरु (८ वी आणि ९ वी) या मोठ्या गटासाठी आदी टॉपिक वर तर ज्युनिअर महागुरू (५ वी ते ७ वी) या लहान गटासाठी आदी टॉपिकवर आधारित आहे. निःशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या नारायण नगरच्या मुख्य शाखा येथे नाव नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे
याच अनुषंगाने ५ एप्रिल रविवारला होणाऱ्या महागुरु स्पर्धेसाठी लवकरात लवकर नावनोंदणी करावी. असे आवाहन प्रा. सच्चीदानंद ढगे, व प्रा. विवेकानंद ढगे संचालक ढगेज् इंग्लिश अकॅडमी, लातूर यांनी केले आहे
पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश महा महागुरू स्पर्धा रविवार, दि.०५ एप्रिल रोजी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis