बीड जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले अधिकृत आदेश
बीड, 02 एप्रिल, (हिं.स.) - बीड जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत २०२६ या वर्षासाठी जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त पहिली स्थानिक सुट्टी असे
बीड जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले अधिकृत आदेश


बीड, 02 एप्रिल, (हिं.स.) - बीड जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत २०२६ या वर्षासाठी जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त पहिली स्थानिक सुट्टी असेल. त्यानंतर १८ सप्टेंबर २०२६ रोजी ज्येष्ठगौरी पूजनानिमित्त दुसरी आणि ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शैक्षणिक संस्थांसाठी लागू राहतील.

जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्थानिक सण आणि परंपरांचे महत्त्व विचारात घेऊन घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सुट्ट्या केवळ राज्य प्रशासकीय विभागांसाठी असून त्या बँका, केंद्र सरकारी कार्यालये आणि दिवाणी व फौजदारी न्यायालयांना लागू नसतील. नागरिकांनी आणि संबंधित विभागाने या सुट्ट्यांच्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपल्या कामकाजाचे नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande