डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणुक रविवार निघणार
सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)। महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळा मिरवणूक ही रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी काढण्यात येणार आहे कारण खालील प्रमाणे तमाम महाराष्ट्रातील, कर्नाटक, आंध्रप्रदेश व मराठवाडा येथील भीमसैनिकांन
ambedkar


सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)। महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळा मिरवणूक ही रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी काढण्यात येणार आहे कारण खालील प्रमाणे तमाम महाराष्ट्रातील, कर्नाटक, आंध्रप्रदेश व मराठवाडा येथील भीमसैनिकांना आजपर्यंत सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक ही 14 एप्रिल नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरी केली जाते हे माहीत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक ही 14 एप्रिल नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी जुन्या परंपरेनुसार साजरी केली जाते. त्या अनुषंगाने तमाम भीमसैनिक हे आपल्या कामकाजातील वेळात वेळ काढून रविवारी सोलापूरला येत असतात. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीची नियोजन बैठक सोलापूर शहरातील सर्व भिमसैनिकांची वतीने शुक्रवार दि. 03/04/2026 रोजी सायंकाळी 5 : 30 वा. न्यु बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे होणार आहे. तरी खालील सर्व मुद्दे हि सोलापूर शहरातील सर्व भिमसैनकांनी उपस्थित केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande