पुणे - ‘ईव्ही चार्जिंग स्टेशन प्रकल्पा’चा बोजवारा
पुणे, 02 एप्रिल, (हिं.स.)। इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोठा गाजावाजा करत उभारलेल्या ‘ईव्ही चार्जिंग स्टेशन प्रकल्पा’चा बोजवारा उडल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत महापालिकेला केवळ 14 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले अ
पुणे - ‘ईव्ही चार्जिंग स्टेशन प्रकल्पा’चा बोजवारा


पुणे, 02 एप्रिल, (हिं.स.)। इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोठा गाजावाजा करत उभारलेल्या ‘ईव्ही चार्जिंग स्टेशन प्रकल्पा’चा बोजवारा उडल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत महापालिकेला केवळ 14 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या या स्टेशनचा नागरिकांकडून पाहिजे तसा वापर होत नसल्याने 40 वरून 80 स्थानकांपर्यंत चार्जिंग स्थानकांचा विस्तार करण्याचा निर्णय महापालिकेने स्थगित केला आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, 2021 अंतर्गत हा प्रकल्प राबविताना महापालिकेकडून अनेक दावे करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात स्थानकांचा वापर वाढविण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन न केल्याने प्रकल्प अडचणीत सापडला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीत उभारलेले हे स्टेशन शहरभर उभी असली तरी त्यांचा वापर अत्यल्प आहे.

महापालिकेने आतापर्यंत 40 चार्जिंग स्टेशन उभारली आहे. ही संख्या 82 आणि पुढे 500 पर्यंत नेण्याचा आराखडा तयार केला होता. मात्र, सध्याच्या अपयशानंतर नवी स्टेशन उभारण्यास प्रशासनानेच बेक लावला असल्याने प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे. सध्या असलेल्या स्थानकांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात असले तरी हा प्रकल्प राबवण्याआधीच योग्य अभ्यास न करता प्रकल्प राबविण्यात आल्याचा आरोप होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande