परभणी - लोकमान्य नगरात प्लास्टिकमुक्त महाप्रसाद पंगतीतून हनुमान जन्मोत्सवाची सांगता
परभणी, 02 एप्रिल (हिं.स.)। येथील लोकमान्य नगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मागील तीस वर्षांपासून साजरा होत असलेला हनुमान जन्मोत्सव यंदा विशेष उपक्रमामुळे चर्चेत आला. “आपली परभणी, स्वच्छ परभणी” फाउंडेशनच्या प्रेरणेने विश्वस्त मंडळाने प्लास्टिकमुक्त
लोकमान्य नगरात प्लास्टिकमुक्त महाप्रसाद पंगतीतून हनुमान जन्मोत्सवाची सांगता


परभणी, 02 एप्रिल (हिं.स.)। येथील लोकमान्य नगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मागील तीस वर्षांपासून साजरा होत असलेला हनुमान जन्मोत्सव यंदा विशेष उपक्रमामुळे चर्चेत आला. “आपली परभणी, स्वच्छ परभणी” फाउंडेशनच्या प्रेरणेने विश्वस्त मंडळाने प्लास्टिकमुक्त महाप्रसाद पंगतीचे आयोजन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या भव्य महाप्रसादासाठी स्टीलचे ग्लास व वाट्यांची खरेदी करण्यात आली असून, पारंपारिक केळीच्या पानांचा वापर करून पंगत मांडण्यात आली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला.

भविष्यातही अशाच पद्धतीने पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी दिली.

हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अशोक ठाकूर, अंबादास शिंदे, सुदाम जाधव, दादाराव भालके, माणिकराव कदम, बाळासाहेब गोंधळकर तसेच फाउंडेशनचे मंगेश रत्नपारखी, दिपक कासांडे, चंद्रकांत दंडे, संदीप पाठक, शिवाजी वांगे, आनंद शिंदे, रामचंद्र भरड, श्रीधर कुलकर्णी, आनंद जोशी, श्रीधर कारेगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande