जुळे सोलापुरातील दोंदे नगरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात
सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.) : जुळे सोलापुरातील दोंदे नगर येथील जागृत हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री हनुमान समाजसेवी संस्थेच्या वतीने आयोजित जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिर पर
Hani


सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.) : जुळे सोलापुरातील दोंदे नगर येथील जागृत हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री हनुमान समाजसेवी संस्थेच्या वतीने आयोजित जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक मंडप उभारण्यात आला होता, तर मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून श्री हनुमानाची गदा साकारण्यात आली होती, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

मंदिर भगव्या पताकांनी सजवल्यामुळे वातावरणात मंगलमय चैतन्य निर्माण झाले होते. याप्रसंगी उद्योजक धीरेंद्र कपूर यांनी आपल्या कुटुंबासोबत श्री हनुमानाची पूजा व आरती केली.हनुमान जयंतीनिमित्त सकाळी जन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर दुपारी बारा ते चार या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. मंदिर परिसरात पूजा साहित्य विक्रीचे विविध स्टॉल्सही लावण्यात आले होते. दिवसभरात सोलापूर शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने हनुमानाचे दर्शन घेतले.

दोंदे नगर येथील हे मंदिर १९९० पासून भाविकांचे श्रद्धास्थान असून २००२ साली मंदिराची भव्य उभारणी करण्यात आली आहे. श्री हनुमान समाजसेवी संस्थेच्या वतीने येथे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बसवराज सोन्नद, विठ्ठल गरड, भिमराया कापसे, सुरेश खमितकर, दयानंद स्वामी, नागेश कालेकर आणि अन्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande