
परभणी, 02 एप्रिल (हिं.स.): छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2026 चा उदघाटन सोहळा 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर होणार आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पारितोषिक वितरण व समारोप समारंभ दि. 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वा. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis