छ. संभाजीनगर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जरंडी ग्रामपंचायत अव्वल
छत्रपती संभाजीनगर, 02 एप्रिल, (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत जरंडीने राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात १९० गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. आता ही ग्रामपंचायत विभागस्तरासाठी पात्र ठरल
छ. संभाजीनगर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जरंडी ग्रामपंचायत अव्वल


छत्रपती संभाजीनगर, 02 एप्रिल, (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत जरंडीने राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात १९० गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. आता ही ग्रामपंचायत विभागस्तरासाठी पात्र ठरली आहे.

जरंडी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात विविध नाविन्यपूर्व उपक्रम राबवत उल्लेखनीय काम केले आहे. यापूर्वी माझी वसुंधरा अभियानात वर्ष २०२३-२४ मध्ये विभागस्तरावर अव्वल दर्जा प्राप्त केला होता. आर. आर आबा स्मार्ट ग्रामस्पर्धेत जिल्ह्यात प्रथम तर चंदेरी कार्ड स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात जरंडी गावाने २०२३-२३ मध्ये विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

गावाच्या स्वच्छ ग्रामस्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तरासाठी पात्र ठरली विकासासाठी विद्यमान सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे, मधुकर पाटील, दिलीप पाटील, मधुकर सोनवणे, संतोष पाटील, सतिश बाविस्कर, भास्कर मुठे, अंबू राठोड पुढाकार घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande