
सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)।
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजलेल्या लगान या हिंदी चित्रपटाचे पटकथाकार तसेच असोसिएट डायरेक्टर कुमार दवे यांचे शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अॅम्फी थिएटर ) येथे लेखन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉ. सचिन खरात हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
क्रिकेटच्या माध्यमातून इंग्रजांना हरवून भारताचा स्वाभिमान भारतीय तरूणांनी कशा प्रकारे टिकवला आणि ब्रिटीश राजवटीला कशा प्रकारे हादरा दिला याचे चित्रण असलेला प्रसिध्द अभिनेता अमीर खान यांचा लगान हा चित्रपट संपूर्ण देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्या चित्रपटाची पटकथा कशा प्रकारे लिहण्यात आली त्यावेळी घडलेले अनेक किस्से या चित्रपटाचे पटकथाकार असलेले कुमार दवे हे आपल्या व्याख्यानातून सांगणार आहेत. आजच्या तरूण पिढीला कुमार दवे यांचे व्याख्यान प्रेरणादायी ठरणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड