सोलापूर - लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी रोखले
सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून (स्मारकावरून) दोन समाजात वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी परि
dfsdf


सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून (स्मारकावरून) दोन समाजात वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. याच दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी अंजनगाव खेलोबा येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, अंजनगाव येथील परिस्थिती आधीच नियंत्रणात आणण्यात आली असल्याने व तेथे पुन्हा तणाव वाढू नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून लक्ष्मण हाके यांना पंढरपूर परिसरातच रोखले व ताब्यात घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande