
जळगाव, 02 एप्रिल, (हिं.स.) - महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग यांच्या मार्फत लिपीक वर्गीय गट ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण दिनांक १५ एप्रिल ते २५ जून २०२६ या कालावधीत (५० दिवस) आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये लेखा, वित्त तसेच शासनाच्या विविध संगणक प्रणालींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
इच्छुक शासकीय कर्मचाऱ्यांनी आवेदन पत्र व शिफारस पत्र १ ते ७ एप्रिल २०२६ दरम्यान सादर करावे. तसेच नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांनी लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन विभागीय सहसंचालक बाबुलाल द. पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर