पुणे - महसूल विभागाच्या सेवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद
पुणे, 02 एप्रिल (हिं.स.)। सातबारा उतारे, मालमत्तापत्रिका (प्रॉपर्टी कार्ड), क प्रत, फेरफार, तसेच नोंदणी मुद्रांक विभागाशी संबंधित महसूल तसेच ‘जी टू बी ऑनलाइन सेवा’ आज, गुरुवारपासून रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार असून, सोमवारपासून (६ एप्
पुणे - महसूल विभागाच्या सेवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद


पुणे, 02 एप्रिल (हिं.स.)। सातबारा उतारे, मालमत्तापत्रिका (प्रॉपर्टी कार्ड), क प्रत, फेरफार, तसेच नोंदणी मुद्रांक विभागाशी संबंधित महसूल तसेच ‘जी टू बी ऑनलाइन सेवा’ आज, गुरुवारपासून रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार असून, सोमवारपासून (६ एप्रिल) या सेवा पूर्ववत सुरू होणार आहेत.

संगणक प्रणाली आणि ऑनलाइन सेवा देखभाल तसेच दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात आजपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भात भूमी अभिलेख विभागाचे संचालक शैलेश नवाल यांनी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

‘भूमी अभिलेख विभागाच्यावतीने विविध प्रकारच्या ऑनलाइन सेवा देण्यात येतात. त्या सेवांचा नागरिकांसह संस्था, बँका, इतर सरकारी विभागांना त्या सेवांचा फायदा होतो. त्यामध्ये भूमी अभिलेख, महाभूमी पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल स्वाक्षरी असलेले आणि केवळ पाहण्यापुरते उपलब्ध असलेल्या सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, क प्रत, फेरफार तसेच नोंदणी मुद्रांक विभागाशी काही महसूल सेवा आणि ‘जी टू बी पोर्टल’वरील सर्व सेवा बंद राहणार आहेत. भूमी अभिलेख तसेच महसूल विभागाच्या सर्व सेवा देणाऱ्या संगणक प्रणाली आणि ऑनलाइन सेवा देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात आजपासून बंद ठेवण्यात येणार आहेत,’ असे नवाल यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande