लातूरमध्ये मटका जुगारावर कारवाई, दोन आरोपी जेरबंद
लातूर, 02 एप्रिल (हिं.स.)। लातूरमध्ये अवैध धंद्यांविरोधात पोलीसांचा धडाका कायम असून, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत जुना रेणापूर नाका परिसरात मटका जुगार
पोलीस कारवाई


लातूर, 02 एप्रिल (हिं.स.)।

लातूरमध्ये अवैध धंद्यांविरोधात पोलीसांचा धडाका कायम असून, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत जुना रेणापूर नाका परिसरात मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने सापळा रचून दुपारी छापा टाकला. यावेळी दोन आरोपी मटक्याचे आकडे लिहून घेताना व पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.

अटक करण्यात आलेले आरोपी:

नागेश गोराखनाथ कोळेकर (वय 24, रा. व्यंकटेश नगर, लातूर)

वसीम निजाम शेख (वय 32, रा. व्यंकटेश नगर, लातूर)

जप्त मुद्देमाल:

मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या

रोख रक्कम

2 मोबाईल फोन

एकूण किंमत: ₹24,310/-

प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा जुगार परवेज शेख (रा. इंडिया नगर, लातूर) याच्या सांगण्यावरून चालवत असल्याचे कबूल केले असून, त्याच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, 1887 अंतर्गत कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande