
हनुमान गढीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.) - हनुमान चालीसाचा विरोध करणाऱ्यांनी धर्माविषयी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नवनीत राणा म्हणाल्या की, अशा भूमिकेचे परिणाम राज्याने पाहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी संकटातून मुक्त होण्यासाठी आपल्या घरी हनुमान चालीसा पठण करावे आणि अमरावतीतील हनुमान गडीवर येऊन दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सहपरिवार येऊन हनुमान चालीसा पठण करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका करत, उद्धव ठाकरेंच्या सेनेतील ९० टक्के नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला.तर नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा वादावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. हनुमान चालीसा पठणाने संकटे दूर होतात, त्यामुळे ठाकरे यांनी अमरावतीच्या हनुमान गडीवर येऊन दर्शन घ्यावे, असे त्यांनी म्हटले. हनुमान चालीसाचा विरोध केल्यामुळेच त्यांच्या अडचणी वाढल्या, असा दावा त्यांनी केला.
संजय राऊत यांच्यावर टीका करत त्या म्हणाल्या की, त्यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली. वैयक्तिक स्टेटसला राजकीय रंग देऊ नये, असेही त्या म्हणाल्या.
आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रावर येणारी संकटे बजरंगबलीच्या कृपेने दूर होतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी हनुमान गडीच्या विकासासाठी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या १२१ कोटी रुपयांबद्दल आभार मानले.
हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त हनुमान चालीसा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील हनुमान गढीवर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून कार्यक्रमांची सुरुवात होणार असून, यामध्ये पारंपरिक पद्धतीने होम-हवन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी