
पी. मोहन यांचे उद्योगांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन नागपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : नागपूर एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्योगांना आगामी 30 जून पूर्वी पाइपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) कनेक्शन घेणे बंधनकारक केले आहे. मुदत उलटल्यानंतर औद्योगिक वापरासाठी गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला जाणार आहे. एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने दिली.
एमआयडीसीचे अध्यक्ष पी. मोहन यांनी सर्व उद्योगांना पीएनजी जोडणीसाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व भागांमध्ये उद्योगांनी लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे, फक्त उद्योगांनाच नव्हे तर एमआयडीसी परिसरातील निवासी वसाहतींनाही सिलिंडर बंद करून पीएनजीकडे वळावे लागणार आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नसून, अर्ज केल्यावर 24 तासांत मंजुरी मिळणार असल्याचे पी. मोहन यांनी स्पष्ट केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे