पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंविरोधात ढोल बजाव आंदोलन, प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत निषेध
नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.)। नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या विरोधात आणि व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांच्या समर्थनार्थ ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कुलगुरूंच्या प्रतिकात्मक प्रतिम
Protest against Pune University


नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.)।

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या विरोधात आणि व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांच्या समर्थनार्थ ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कुलगुरूंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच ‘कुलगुरू’ नावाचा प्रतीकात्मक दगड स्थापन करून त्याचा धिक्कार करण्यात आला.

यावेळी कुलगुरूंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात एबीव्हीपी, विद्यार्थी कृती समिती (नाशिक जिल्हा), शिवसेना युवा सेना, मनविसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि युवा सेना या संघटनांचा सहभाग होता. अजिंक्य गीते, सागर शेलार, गोविंद देशपांडे, मेघा शिरगावे, प्रवीण चव्हाण, व्यंकटेश अवसरकर यांच्यासह सिनेट सदस्य विजय सोनवणे आणि संजय कीर्तने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande