लातूर - जागतिक ऑटिझम दिनानिमित्त जि. परिषदेत जनजागृती
लातूर, 02 एप्रिल, (हिं.स.) : जागतिक ऑटिझम दिनानिमित्त गुरुवारी जिल्हा परिषद परिसरात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “ऑटिझम आणि मानवता – प्रत्येक जीवनाला मूल्य आहे” या मुख्य थीमच्या आधारे विविध पैल
ऑटीझम दिन


लातूर, 02 एप्रिल, (हिं.स.) : जागतिक ऑटिझम दिनानिमित्त गुरुवारी जिल्हा परिषद परिसरात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “ऑटिझम आणि मानवता – प्रत्येक जीवनाला मूल्य आहे” या मुख्य थीमच्या आधारे विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना निळ्या रंगाची रिबीन बांधून स्वमग्नता (ऑटिझम) दिनाचे महत्त्व पटवून दिले. शांती व स्वीकाराचे प्रतीक असलेल्या निळ्या रंगाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

यावेळी उपस्थितांना ऑटिझमविषयी माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. ऑटिझम म्हणजे काय, त्याची प्रमुख लक्षणे, सामाजिक व संवादातील अडचणी, पुनरावृत्ती वर्तन, संभाव्य कारणे, लवकर ओळख, निदान, उपचार व व्यवस्थापन या विविध विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात “मानवता आणि मूल्य”, “सर्वसमावेशकता” आणि “जागरूकता” या मुख्य पैलूंवर विशेष भर देण्यात आला. स्वमग्न व्यक्तींचा सन्मान, त्यांचे हक्क, समाजातील समावेश आणि समान संधी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच त्यांच्या अद्वितीय क्षमतांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बसवराज पैके तसेच स्वारातीम विद्यापीठ उपकेंद्राच्या समाजकार्य विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande