‘आरटीई’ लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज
सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.) मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. त्या शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील एकूण पटाच्या २५ टक्के जागा अशा विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. सोल
rte


सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.) मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. त्या शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील एकूण पटाच्या २५ टक्के जागा अशा विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. सोलापूर जिल्ह्यातील २८५ खासगी स्वंयअर्थसहाय्यिता शाळांमध्ये दोन हजार ८७२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. परंतु, त्यासाठी जिल्ह्यातून तब्बल सहा हजार ७०९ विद्यार्थ्यांनी (दुपटीपेक्षा जास्त) अर्ज केले आहेत.

साेलापूरसह राज्यभरात १० हजारांवर नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळा आहेत. त्याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पालकांना दरवर्षी किमान ५० हजार ते दीड लाखांपर्यंत शुल्क मोजावे लागते. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये प्रवेश घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशावेळी ‘आरटीई’च्या लॉटरीत ज्यांचा क्रमांक लागतो आणि पात्र विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये मोफत प्रवेश द्यावा लागतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande