
सोलापूर, 02 एप्रिल, (हिं.स.) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सतत नकार दिला जात होता याकरिता संबंधितांना जाऊन चा विचारला असता उलट कर्मचाऱ्यांची दादागिरी दिसून आली. यावर विद्यापीठाचे रजिस्टर श्री.लकडे साहेब यांच्याकडे समक्ष भेटून तक्रार केली यावर आपल्याकडे साहेबांनी संवेदनशीलपणा दाखवत संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलाच दम दिला व त्या कर्मचाऱ्यांनी माफी मागून व लिखित स्वरूपात माझ्या नावे माफीनामा दिला व यापुढे असा प्रकार होणार नाही याची ग्वाही दिली. तसेच विद्यार्थ्यांना बिनशर्त ऍडमिशन दिले.
यावेळी गणेश शहापूरकर,आनंद मोरे,विकी शेंडगे,यल्लाप्पा बनसोडे,आतिश गायकवाड,कबीर तांडुरे, विनेश शहापूरकर,मच्छिंद्र आयवळे,नवनाथ मस्के आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड