
परभणी, 02 एप्रिल (हिं.स.) : परळी-वडगाव रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी रेल्वे गाड्या विनाकारण दोन-दोन तास थांबवून ठेवल्या जात असल्याची गंभीर समस्या समोर आली होती. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत होती.
या समस्येवर स्थानिक वृत्तपत्रांच्या संपादकांनी आणि पत्रकारांनी बातम्या प्रसिद्ध करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करत चौकशी सुरू केली. वरिष्ठ अधिकार्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तांत्रिक कारणांचा सखोल तपास केला.
तपासणीत विलंबामागील कारणांचा शोध घेण्यात आला आणि त्वरित आवश्यक त्या सूचना अमलात आणण्यात आल्या. परिणामी, आता गाड्या वेळेतच पुढे जात आहेत. पूर्वी जिथे गाड्या दोन तासांपर्यंत थांबत होत्या, तिथे आता फक्त 5 ते 10 मिनिटांचा अधिकृत थांबा घेत गाड्या सुचारूपणे पुढे निघत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकावर पोलीस चौकीही स्थापन करण्यात आली असून, यामुळे शिस्तबद्ध हालचालींना चालना मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis