
बीड, 02 एप्रिल (हिं.स.) - बीड जिल्ह्यातील हवामानात मोठा बदल झाला असून अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान केले पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे
केज तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या प्रकोपाने आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले असून झाडावरील कैऱ्या गळून पडल्या आहेत. तसेच पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या वेळी निसर्गाचा हा कोप झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis