लातूर - गुरनाळ येथे 'पोकरा योजना' अंतर्गत कृषी विभागाचे विविध उपक्रम
लातूर, 02 एप्रिल (हिं.स.)। संवर्धन, जलसंधारण, शेततळे, विहीर देवणी तालुक्यातील गुरनाळ येथे नानाजी पुनर्भरण आणि वृक्षारोपण यांचे महत्त्व देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा २.०) अंतर्गत ''पोक रा योजना'' राबवत विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आ
पोकरा प्रकल्प


लातूर, 02 एप्रिल (हिं.स.)। संवर्धन, जलसंधारण, शेततळे, विहीर देवणी तालुक्यातील गुरनाळ येथे नानाजी पुनर्भरण आणि वृक्षारोपण यांचे महत्त्व देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा २.०) अंतर्गत 'पोक रा योजना' राबवत विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले. तालुका कृषी कार्यालय देवणी व ग्राम कृषी विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून श्रमदान, स्वच्छता शिबिर, प्रभात फेरी तसेच मार्गदर्शनपर

बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांना माननीय उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयश यादव, प्रकल्प व्यवस्थापक आर. जी. कांबळे, एनआरएम समन्वयक मारुती सूर्यवंशी तसेच कृषी सहायक डी.पी. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून माती आडवा, पाणी जिरवा' या संकल्पनेवर भर देत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प ग्रामस्थांना पटवून देण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदान करत स्वच्छता अभियान राबविले तसेच प्रभात फेरीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम कृषी विकास समितीचे पदाधिकारी व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande