पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन करणार - विजय चोरडिया
-तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन परभणी, 02 एप्रिल (हिं.स.)। राज्यभरात पत्रकारावर होत असलेले हल्ले, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे, यासह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येत असून शासनाने याची दखल न घे
पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन करणार - विजय चोरडिया -तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन


-तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

परभणी, 02 एप्रिल (हिं.स.)।

राज्यभरात पत्रकारावर होत असलेले हल्ले, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे, यासह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येत असून शासनाने याची दखल न घेतल्यास राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला. पत्रकारांच्या विविध मागण्याच्या संदर्भात गुरूवारी(दि. २) तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते.लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर ठिकठिकाणी हल्ले होत आहेत. शिवाय खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात येत नाही. शिवाय राज्यस्तरावरील विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना चोरडिया म्हणाले, राज्यशासन लहान वर्तमानपत्रांची गळचेपी करत असून त्यांना मिळणाऱ्या जाहिरातींची संख्या अत्यंत अपुरी आहे. शिवाय जाहिरातीचा दर अत्यंत कमी असून इतर दैनिकांच्या तुलनेने त्यांना मिळत असलेल्या जाहिराती या आकाराने लहान आहेत. लहान वर्तमानपत्रांना जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या बाबतीत सुद्धा भेदभाव करण्यात येत आहे. पत्रकारांना देण्यात येणारी अधिस्वीकृती हे ग्रामीण पत्रकारांना देण्यात यावी. त्या संदर्भात असलेल्या अटी शिथिल करण्यात याव्या. पत्रकारांना मिळणाऱ्या पेन्शनच्या संदर्भामध्ये जाचक अटी शासनाने रद्द करावे. या व इतर मागण्यांसाठी राज्यभर तालुका व जिल्हास्तरावर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाने या आंदोलनाची वेळीच दखल घेणे अत्यंत गरजेचे असून आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यभर या प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला. जिंतूर येथे तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार प्रशांत राखे यांना पत्रकारांच्या विविध मागण्याची निवेदन देण्यात आले. या मागण्या शासनस्तरावर पाठवण्याची विनंती त्यांना करण्यात आली.यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा मार्गदर्शक राजाभाऊ नगरकर, तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख, सचिन रायपत्रीवार, गुलाबराव शिंदे, नागनाथ दाभाडे, अरविंद तरटे, संदीप माहूरकर आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande