परभणी जिल्हा परिषदेत महिलाराज
- अध्यक्ष, चार सभापती व मुख्य कार्यकारी अधिकार्यासह अतिरिक्त कार्यकारी अधिकारीसुध्दा महिलाच परभणी, 02 एप्रिल (हिं.स.)। परभणी जिल्हा परिषदेवर अध्यक्षांपाठोपाठ चारही विषय समित्यांच्या सभापती पदी गुरुवारी महिला सदस्याच बिनविरोध विराजमान झाल्या आहेत
परभणी जिल्हा परिषदेत महिलाराज..! अध्यक्ष, चार सभापती व मुख्य कार्यकारी अधिकार्यासह अतिरिक्त कार्यकारी अधिकारीसुध्दा महिलाच


- अध्यक्ष, चार सभापती व मुख्य कार्यकारी अधिकार्यासह अतिरिक्त कार्यकारी अधिकारीसुध्दा महिलाच

परभणी, 02 एप्रिल (हिं.स.)।

परभणी जिल्हा परिषदेवर अध्यक्षांपाठोपाठ चारही विषय समित्यांच्या सभापती पदी गुरुवारी महिला सदस्याच बिनविरोध विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे या चार महिला सभापतींबरोबर अध्यक्ष तसेच प्रशासकीय यंत्रणेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह अतिरिक्त कार्यकारी अधिकारीपदी सुध्दा महिला अधिकारी कार्यरत असल्यामुळेच जिल्हा परिषदेवर खर्याअर्थाने महिलाराज सुरु झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हा. गटातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्या लता वाकळे यांची बिनविरोध निवड झाली. त्या पाठोपाठ चार विषय समित्यांच्या सभापती पदाकरीता गुरुवार 2 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या विशेष सभेतून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी ऐश्वर्या अजय चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती पदी पार्वती मुंढे, तर अन्य दोन समित्यांच्या सभापती पदी वैशाली पंकज अंबेगांवकर व कौशल्या शिंदे या नवनिर्वाचित सदस्यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर अपवाद सहा पदाधिकार्यांपैकी पाच पदाधिकारी पदी योगायोगाने महिला सदस्या विराजमान झाल्या आहेत. त्यातही एक योगायोग असा, जिल्हा परिषदेवर विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नितीशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर तर समाजकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रेखा काळम या महिला अधिकारी कार्यरत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande