छ. संभाजीनगर - करमाड, लाडसावंगी, प्रिंप्रीराजा मंडळात पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर, 02 एप्रिल, (हिं.स.)। करमाड, लाडसावंगी, प्रिंप्रीराजा मंडळात पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्ग अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांची यावे
अ


छत्रपती संभाजीनगर, 02 एप्रिल, (हिं.स.)। करमाड, लाडसावंगी, प्रिंप्रीराजा मंडळात पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्ग अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.

या अभ्यास वर्गामध्ये विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करत संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. कार्यकर्त्यांच्या वैचारिक बळकटीसह संघटनात्मक कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

या अभ्यास वर्गाला प्रमुख वक्ते म्हणून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.संजयजी कौडगे , जिल्हाध्यक्ष श्री.सुहासभाऊ शिरसाठ, प्रदेश सदस्य श्री.सुरेश पाटील बनकर, प्रदेश सचिव श्री.रेखाताई कुलकर्णी, सरचिटणीस तथा सभापती श्री.श्रीराम बाबा शेळके, श्री.रामु काका शेळके, श्री.सजन नाना मते, श्री.सुरज लोळगे आणि श्री.विकास गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख आणि बूथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande