सोलापूर विमानतळावरून हैदराबादसाठी १७ एप्रिलला पहिले उड्डाण होणार
सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबई व आता हैदराबाद शहर सोलापूरशी विमानसेवेने जोडले जाणार आहे. आज गुरुवारपासून तिकीट बुकिंगला सुरवात होणार आहे. १७ एप्रिलला सोलापूर विमानतळावरून हैदराबादसाठी पहिले उड्डाण होणार आहे. सोलापूरहून
Airport Solapur Today


सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबई व आता हैदराबाद शहर सोलापूरशी विमानसेवेने जोडले जाणार आहे. आज गुरुवारपासून तिकीट बुकिंगला सुरवात होणार आहे. १७ एप्रिलला सोलापूर विमानतळावरून हैदराबादसाठी पहिले उड्डाण होणार आहे.

सोलापूरहून फ्लाय ९१ कंपनीकडून सुरवातीस गोवा, त्यानंतर स्टार एअर इंडिया कंपनीकडून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू केली. सोलापूर ते बंगळुरू, सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे पण नाईट लॅंडिंगची व्यवस्था नसल्याने दोन्ही शहरासाठी विमानसेवा सुरू करण्यास कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर फ्लाय ९१ कंपनीकडून सोलापूर-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. २ एप्रिल रोजी तिकीट बुकिंगला सुरुवात होईल आणि १७ एप्रिलला हैदराबादसाठी पहिले विमान उड्डाण घेणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande