
लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात आले आहे. जिल्हयातील कोणत्य ग्रामपंचायतीने विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात केली. त्यासंदर्भ ग्रापंचायती प्रत्येक घटक निहाय स्वमुल्यांकनाचे प्रस्ताव दि. २५ एप्रिल पर्यंत ऑनलाईन सादर करत आहेत. त्यानंतर सांगली जिल्हयाच्या तालुका स्तरीय टिमकडून लातूर जिल्हयातील सर्वाधिक गुणांकन असलेल्या २०१ ग्रामपंचातींचे तालुका स्तरीय मुल्यमापन दि. २६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत होणार आहे. यात प्रत्येक तालुक्यातून पाच ग्रापंचायतींची निवड होणार आहे.
लातूर जिल्हयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ राबविले जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची
तपासणी समितीत ५ जणांचा समावेश आहे.
लातूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतींचे अंतिम स्वगुनांकन जवळपास पूर्ण झाले आहे. सांगली जिल्हयातील गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या तालुका स्तरीय टिमकडून लातूर जिल्हयातील १० तालुक्यातील प्रत्येकी २० अशा २०१ ग्राम पंचायतींची तपासणी करून त्या-त्या तालुक्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन विशेष पुरस्कारासाठी ग्रामपंचायती निवडल्या जाणार आसल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी दिली.
चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील ७८७ ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ऑनलाईन स्वरूपात सहभाग नोंदवला आहे. या अभियानाचा कालावधी दि. १७ सप्टेंबर ते दि. १५ एप्रिल असा आहे. सदर अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना १०० गुणांचे स्वमुल्यांकन सादर करण्यासाठी दि. १ ते १५ एप्रिल अशी मुदत देण्यात आली आहे. शासनाने नेमलेल्या सांगली जिल्हयाच्या तालुका स्तरीय टिमकडून लातूर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील २० अशा २०१ ग्रामपंचायतींच्या स्वगुनांकनांची तपासणी होणार आहे. तालुक्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतींना लाखो रूपयांची बक्षीसे मिळणार असून त्याच बरोबर जिल्हा स्तरावरच्या स्पर्धेत उतरता येणार आहे. जिल्हा स्तरावरही प्रत्येक तालुक्यातून पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतींची
असा आहे मुल्यांकनाचा कालावधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत २०२५-२६ करिता ग्रामपंचायती दि. १ ते दि. २५ एप्रिल स्वमुल्यांकन प्रस्ताव सादर करणार आहेत. तसेच तालुकास्तरीय मुल्यमापन दि. २६ एप्रिल ते दि. १५ मे पर्यंत होणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय मुल्यमापन दि. १६ मे ते दि. ५ जून पर्यंत, ४. विभागस्तरीय मुल्यमापनः- दि. ६ ते दि. १५ जून व राज्यस्तरीय मुल्यमापन दि. १६ ते दि. ३० जून या कालावधीत होणार आहे.
जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी होऊन तीन ग्रामंपंचायतींना लाखोची बक्षीसे मिळणार आहेत. तसेच विभाग स्तर, राज्य स्तरावर जाणाऱ्या ग्रामपंचायतींना कोटयावधी रूपयांची बक्षीसांची लयलूट करता येणार.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis