अमरावती मनपाच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'कूल रूफ' उपक्रमाला राज्य सरकारचा प्रथम पुरस्कार
अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ''राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२५-२०२६'' चे राज्यस्तरीय निकाल जाहीर झाले असून, यात अमरावती महानगरपालिकेने आपल्या स्तरावर राज्यात प्रथम क्रमा
अमरावती मनपाच्या शिरपेचात मानाचा तुरा 'कूल रूफ' उपक्रमाला राज्य सरकारचा प्रथम पुरस्कार


अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.)

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२५-२०२६' चे राज्यस्तरीय निकाल जाहीर झाले असून, यात अमरावती महानगरपालिकेने आपल्या स्तरावर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महानगरपालिका स्तरावरून थेट प्राप्त झालेल्या प्रस्तावांमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या 'कूल रूफ' या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सर्वोत्तम ठरवण्यात आले आहे. वाढत्या तापमानावर करण्यासाठी आणि शहराला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी राबवलेला हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. या गौरवाबद्दल महानगरपालिकेला १० लाख रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल अमरावती महानगर पालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनायायशाचे श्रेय देण्यात आले आहे. या पुरस्काराच्या रकमेचा विनियोग कार्यालयांच्या सुधारणेसाठी किवा संबंधित प्रकल्पाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी बंधनकारक असल्याचे शासनाने आदेशात नमूद केले आहे.

या यशाबद्दल प्रशासकीय वर्तुळातून महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत अमरावती विभागातील इतरही काही अधिकाऱ्यांनी वैयक्तिक श्रेणीत यश मिळवले आहे. या पुरस्कारांचे वितरण २१ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता, सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष समारंभात केले जाणार आहे. अमरावतीने प्रशासकीय गतिमानतेत मारलेली ही झेप शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा असून, राज्यातून अमरावतीच्या मॉडेलचे कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande