
नांदेड, 20 एप्रिल (हिं.स.)।
कौठा ते गडगा मार्गावरील मानार प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील अरुंद पुलावरून एक कार थेट कालव्यात कोसळली. या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले.
गडगा येथून कौठ्याकडे येणारी क्रमांकाची कार एका कार्यक्रमावरून परतत होती. पुलाजवळ पोहोचताच चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि कार कालव्यात कोसळली. पूल अत्यंत अरुंद असल्यामुळे वाहनाला संतुलन राखता आले नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली. कारमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान बालक प्रवास करत होते. अपघातग्रस्त हे राऊतखेडा येथील सेवानिवृत्त सैनिक व त्याचे कुटुंब आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही नागरिकांनी कालव्यात उतरून जखमींना बाहेर काढले. त्यानंतर सर्वांना तातडीने जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नांदेड येथे पाठवण्यात आले. सुदैवाने कालव्यात पाणी नसल्यामुळे मदतकार्य करताना कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis