रेल्वे दुहेरीकरण कामासाठी १४ गावांमध्ये संयुक्त मोजणी
नांदेड, 20 एप्रिल (हिं.स.)। धर्माबाद व उमरी तालुक्यांतून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्याअंतर्गत संयुक्त मोजणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या मोहिमेंतर्गत २७ एप्रिल दरम्यान १४ गावांमध्ये मोजणी क
रेल्वे दुहेरीकरण कामासाठी १४ गावांमध्ये संयुक्त मोजणी


नांदेड, 20 एप्रिल (हिं.स.)।

धर्माबाद व उमरी तालुक्यांतून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्याअंतर्गत संयुक्त मोजणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या मोहिमेंतर्गत २७ एप्रिल दरम्यान १४ गावांमध्ये मोजणी केली जाणार आहे.

मुदखेड ते मेडचल (२२१.०६ कि. मी.) या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी धर्माबाद व उमरी तालुक्यातील संपादित होणाऱ्या जमिनींची संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित गावांमध्ये ठराविक दिवशी मोजणी केली जाणार

आहे. धर्माबाद बिळगाव (घ.) २२ एप्रिल, करखेली २३ एप्रिल व बाळापूर २४ एप्रिल, उमरी तालुक्यात बोलसा (बु.), हिरडगाव २१ एप्रिल, गोरठा २२ एप्रिल, पळसरगाव २३ एप्रिल, ढोलउमरी व शिवनगाव २४ एप्रिल, सेलगाव व सिंधी येथे २७ एप्रिल रोजी मोजणी होणार आहे. मोजणीदरम्यान संबंधित गट क्रमांकातील सर्व भूधारकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande