
छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)।
रोज ३० मालमत्तांची नोंदणी
करून कर छत्रपती संभाजीनगर शहरातील मालमत्तांचे जीआयएस मॅपिंगद्वारे फेरमूल्यांकन आकारणी करण्यासाठी विशेष अभियान सुरु केले जाणार आहे. त्यासाठी ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली असून हे कर्मचारी दररोज ३० मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करतील. अशी माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर
महापालिकेच्या वतीने मालमत्तांना कर आकारणी करून दिली जात असली तरी कालांतराने मालमत्तांच्या बांधकामात बदल केला जात असल्याने त्यावर कर आकारणी मात्र होत नाही. तसेच गुंठेवारी भागातदेखील मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. अनेकांनी फ्लॅट, रो-हाऊसची खरेदी केली
असून त्यांनाही कर आकारणी झालेली नाही. त्यामुळे आयुक्त अमोल येडगे यांनी कर आकारणीसाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, नवीन मालमत्तांची खरेदी केल्यानंतर मालमत्ताधारकांकडून कर आकारणीसाठी प्रस्ताव आल्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून
टाळाटाळ केली जाते. तसेच वाढीव बांधकामांना कर आकारणी झालेली नाही. मालमत्तांचे फेरमूल्यांकन होणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यासाठी जीआयएस मॅपिंगद्वारे मालमत्तांचे फेरमूल्याकंन करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
मालमत्ता कर विभागातील कर्मर्चायांवर जबाबदारी टाकण्यात आली आली असून त्यांच्याकडे असलेल्या भागातील मालमत्तांना कर आकारणीचे सात दिवसांत पूर्ण करावे लागेल. यावरून कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल.
प्रत्येक झोन कार्यालयात हेल्प डेक्स सुरू केले जाणार आहे. मालमत्तासंबंधी असलेल्या तक्रारीचे निकारण हेल्प डेक्सद्वारे तातडीने पूर्ण केले जाईल. हेल्प डेक्सचे संपर्क नंबर दिले जातील.
आकारणी विभागातील दोन कर्मचारी या प्रमाणे ४० कर्मचारी प्रत्येक झोन कार्यालयास उपलब्ध करून दिले जातील. हे कर्मचारी झोन मधील प्रत्येक मालमत्ताचे जीआयएस मॅपिंगकरून कर आकारणी करतील. यामुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis