परतवाडा प्रकरणात नवे धक्कादायक व्हिडिओ; आरोपी अयानची ऐशोआरामी लाईफस्टाईल चर्चेत
अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.) परतवाडा येथे तरुणींचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणाने आधीच खळबळ उडवली असताना, आता मुख्य आरोपी अयान अहमदच्या लाईफस्टाईलचे नवे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमुळे प्रकरणाला आणखी वे
अयान अहमद व उजेरमध्ये होता पैशाचा वाद


अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.) परतवाडा येथे तरुणींचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणाने आधीच खळबळ उडवली असताना, आता मुख्य आरोपी अयान अहमदच्या लाईफस्टाईलचे नवे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले असून, आरोपीच्या आर्थिक स्रोतांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अयान अहमद हा महागड्या गाड्यांमध्ये फिरताना, हातात पैशांच्या बंडलांसह तसेच गाडीत पिस्तुल ठेवून रौब दाखवताना दिसत आहे. त्याच्याकडे तीन ते चार महागडे आयफोन असल्याचेही व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, तो वापरत असलेली नवी कोरी ‘थार’ गाडी (क्रमांक MH-27-DL-3100) ही नेमकी कुणाच्या मालकीची आहे, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.या गाडीचे मालकत्व अयानच्या नावावर आहे की अन्य कोणाच्या, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पिस्तुलाबाबतही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अयानकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का, की हे बेकायदेशीर शस्त्र होते, याचीही तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.दरम्यान, अयानच्या सोशल मीडियावरील रिल्समध्ये “ये जरूर कुछ बड़ा करेगा, क्योंकि इसे जिंदगी से ज्यादा अपनी जीत प्यारी है” असा उल्लेख आढळून येत असून, त्याच्या मानसिकतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या रिल्समधून तो स्वतःची एक वेगळी, दबंग प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.परतवाडा येथील या संपूर्ण प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून, पोलिसांच्या तपासाची व्याप्ती वाढत चालली आहे. आरोपीकडे एवढा पैसा आणि महागड्या वस्तू नेमक्या कुठून आल्या, याचा शोध घेणे तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये इतर कोणते गुन्हेगारी जाळे किंवा साथीदार सहभागी आहेत का, याचाही शोध घेण्याची गरज आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून सर्व संबंधित बाबी उघड कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande