छ. संभाजीनगर शहरात परशुराम जयंती उत्साहात वेदपठण, स्तंभपूजन, दुचाकी फेरींचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)। चारही वेदांचे पठण, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा समाजबांधवांचा सत्कार, दुचाकी फेरी, सायंकाळी जन्मोत्सव सोहळा आणि मिरवणूक आदी विविध उपक्रमांनी शहरात भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली. औरंगप
छ. संभाजीनगर शहरात परशुराम जयंती उत्साहात वेदपठण, स्तंभपूजन, दुचाकी फेरींचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)।

चारही वेदांचे पठण, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा समाजबांधवांचा सत्कार, दुचाकी फेरी, सायंकाळी जन्मोत्सव सोहळा आणि मिरवणूक आदी विविध उपक्रमांनी शहरात भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली. औरंगपुरा येथील परशुराम स्तंभाचे पूजन व आरती करण्यात आली. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्राह्मण समाज समन्वय समिती, भगवान परशुराम जन्मोत्सव समिती,

शहरात भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राजस्थानी विप्र मंडळ आदींचे पदाधिकारी, नवनाथ महाराज आंधळे, विवेक देशपांडे, जयवंत ओक, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक कीर्ती शिंदे, अनिल खंडाळकर, गोपाळ कुलकर्णी, आनंद तांदुळवाडीकर, ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद

दामोदरे, प्रकल्प प्रमुख भीमराव कुलकर्णी, दत्तात्रेय पिंगळे आदी या वेळी उपस्थित होते. सुरवातीला बंडू गुरुजी पुजारी, अमोल जोशी, जीवनगौरव भोगावकर, विश्वास नागपूरकर यांनी वेदमंत्र पठण केले.

समर्थनगर येथील श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आकर्षक देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. दुग्धविकास मंत्री अतुल सावे, विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, महापौर समीर रेणुकादास वैद्य आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande