एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधात २७ एप्रिलला मोर्चा
छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून सरकारचे जाती-जातीत भांडण लावण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात २७ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आ
एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधात २७ एप्रिलला मोर्चा


छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)।

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून सरकारचे जाती-जातीत भांडण लावण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात २७ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

पी.एस. तंत्रनिकेतन

महाविद्यालयात झालेल्या या बैठकीत ज्येष्ठ नेते मिलिंद दाभाडे, दिनकर ओंकार, गौतम खरात, गौतम लांडगे, किशोर थोरात, कृष्णा भंडारे, राहुल साळवे, विजय वाहूळ यांचे प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण संदर्भात न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल जनतेसाठी अजूनही प्रकाशित करण्यात आलेला नाही. तरीही हरकती सूचना आणि ई-मेल मागवण्यात आलेले आहे. एससी उपवर्गीकरणास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे. हे उपवर्गीकरण रद्द झाले पाहिजे, असे मत आंबेडकर चळवळीतील अनेक नेत्यांनी मांडले. अनुसूचित जाती

आरक्षण वर्गीकरण रद्द करावे, या मागणीसाठी २७ एप्रिल रोजी मिल कॉर्नर येथील छत्रपती शाहू महाराज पुतळा ते विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande