करडी तेलाचे दर किंचित घटले लिटरचा भाव २७० रुपये
छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)। करडी तेलाचे भाव अलीकडे कमी होऊन २७० रुपये लिटरपर्यंत खाली आले आहेत. मात्र, अपेक्षेप्रमाणे घट काही झालेली नाही आणि यापेक्षा भाव आणखी कमी होण्याविषयी शंका घेतली जात आहे. वस्तुतः करडीचा मोसम संपत आला असताना, आव
करडी तेलाचे दर किंचित घटले लिटरचा भाव २७० रुपये


छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)।

करडी तेलाचे भाव अलीकडे कमी होऊन २७० रुपये लिटरपर्यंत खाली आले आहेत. मात्र, अपेक्षेप्रमाणे घट काही झालेली नाही आणि यापेक्षा भाव आणखी कमी होण्याविषयी शंका घेतली जात आहे. वस्तुतः करडीचा मोसम संपत आला असताना, आवक समाधानकारक नाही, याकडेही लक्ष वेधले जात आहे.

करडी तेलाचे; तसेच शेंगदाणा तेलाचे भाव

जवळजवळ समान होते. मात्र, सलग दोन वर्षांपासून करडीचे उत्पन्न लक्षणीय प्रमाणात घटले आणि करडी तेलाचे भाव किमान दीड वर्षापासून ३०० रुपये लिटरपुढेच असल्याचे दिसून येत आहे. याच सततच्या दरवाढीमुळे करडीचे अनेक पारंपरिक ग्राहक दुसऱ्या खाद्यतेलाकडे वळाले

करडी व्यतिरिक्त इतर खाद्यतेलांचे दर सध्या तरी बऱ्यापैकी स्थिर आहेत. त्यामुळेच शेंगदाणा तेलाचा भाव लिटरमागे २०० रुपयांपर्यंत, सरकी रिफाइंड १५० रुपयांपर्यंत, सूर्यफूल १८५ रुपयांपर्यंत, सोयाबीन १६० रुपयांपर्यंत, तर पाम तेल ११५ रुपयांपर्यंत विक्री होत आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे काही आठवड्यांपूर्वी काही अंशी दरवाढ झाली होती. मात्र, त्यानंतर फारशी दरवाढ झालेली नाही, असेही दिसून येत आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande