आसाम एग्झिट पोल : भाजपला स्पष्ट बहुमताचा अंदाज
नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.) : आसाम विधानसभा निवडणुकीच्या एग्झिट पोलचे निकाल समोर आले असून, सत्ताधारी भाजप आणि एनडीए आघाडीला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध प्रमुख सर्व्हेच्या मते भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थाप
संग्रहित लोगो


नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.) : आसाम विधानसभा निवडणुकीच्या एग्झिट पोलचे निकाल समोर आले असून, सत्ताधारी भाजप आणि एनडीए आघाडीला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध प्रमुख सर्व्हेच्या मते भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकते.

एग्झिट पोलचे महत्त्वाचे अंदाज

पश्चिम बंगालचे मतदान आटोपल्यानंतर बुधवारी जाहीर झालेल्या एग्झिट पोलमध्ये आसाममध्ये एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभा निवडणुकीत एनडीएला एकूण 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. विविध एग्झिट पोलच्या अंदाजानुसार आसाममध्ये भाजपला 86 ते 100 जागा मिळतील तर काँग्रेसला 15 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर पक्षांना 2 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या अंदाजांनुसार, एनडीए आघाडी आसाममध्ये मोठ्या बहुमतासह पुन्हा सत्ता राखण्याच्या मार्गावर आहे. जर हे आकडे प्रत्यक्ष निकालांमध्येही कायम राहिले, तर भाजपला राज्यात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल.आसामसह तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुदुच्चेरीतील मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. अंतिम निकालानंतरच वास्तविक राजकीय चित्र स्पष्ट होईल.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande