पश्चिम बंगाल : दोन टप्प्यांत 92 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान
कोलकाता, 29 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेत यंदा अभूतपूर्व मतदानाचा कल दिसून आला आहे. पहिल्या टप्प्यात 93.19 टक्के मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यातही जवळपास 92 टक्के मतदान नोंदवले गेले. यामुळे दोन्ही टप्प्यांचा एकूण सरासर
मतदान लोगो


कोलकाता, 29 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेत यंदा अभूतपूर्व मतदानाचा कल दिसून आला आहे. पहिल्या टप्प्यात 93.19 टक्के मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यातही जवळपास 92 टक्के मतदान नोंदवले गेले. यामुळे दोन्ही टप्प्यांचा एकूण सरासरी मतदानाचा दर 92.63 टक्क्यांपेक्षा अधिक झाला असून, हा देशातील कोणत्याही राज्यासाठी आतापर्यंतचा नवा विक्रम मानला जात आहे.

राज्यात आज, बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले. यानंतर दोन्ही टप्प्यांचा मिळून एकूण मतदानाचा दर 92.52 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये कधीही मतदान 84.72 टक्क्यांपेक्षा जास्त झाले नव्हते. त्यामुळे यंदाची निवडणूक राज्याच्या निवडणूक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.देशपातळीवर पाहता, हा मतदानाचा दर आतापर्यंतचा सर्वोच्च मानला जात आहे. यापूर्वी हा विक्रम त्रिपुराकडे होता, जिथे 2013 मध्ये 91.82 टक्के मतदान नोंदवले गेले होते. मात्र पश्चिम बंगालने हा विक्रम यंदा मोडीत काढला आहे.

मागील निवडणुकांपेक्षा मोठी वाढ

राज्यात 2021 च्या निवडणुकीत 8 टप्प्यांत मतदान झाले होते आणि एकूण मतदानाचा दर 82.17 टक्के होता. त्या तुलनेत यंदा केवळ दोन टप्प्यांतच मतदान पूर्ण झाले असून मतदानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. तर 2021 मध्ये संबंधित मतदारसंघांमध्ये मतदान अनुक्रमे 83.18 टक्के आणि 81.08 टक्के होते. त्याच्या तुलनेत 2026 मध्ये याच भागात मतदान 90 टक्क्यांच्या पुढे गेले आहे.

मतदानाचा ऐतिहासिक प्रवास

पश्चिम बंगालमध्ये याआधी सर्वाधिक मतदान 2011 मध्ये 84.33 टक्के झाले होते. त्याच निवडणुकीनंतर राज्यात राजकीय सत्ता बदल झाला होता. याशिवाय 1996 आणि 2006 मध्येही मतदान 80 टक्क्यांपेक्षा जास्त झाले होते.

मात्र 2026 मध्ये हा सर्व रेकॉर्ड मोडला गेला आहे.

मतदारसंख्या आणि सहभागात वाढ

राज्यात 2021 मध्ये 7.34 कोटी मतदार नोंदणीकृत होते, त्यापैकी 6.03 कोटी मतदारांनी मतदान केले होते. 2026 मध्ये विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) नंतर 6.82 कोटी मतदार नोंदणीकृत झाले असून त्यापैकी 6.25 कोटींहून अधिकांनी मतदान केले आहे. त्यामुळे मतदार सहभागातही वाढ दिसून आली आहे.----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande