केरळ एक्झिट पोल : यूडीएफला बहुमत, एलडीएफ सत्तेतून बाहेर
नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.) : केरळ विधानसभा निवडणूक 2026 चे एक्झिट पोल जाहीर झाले असून राज्यात सत्ता परिवर्तनाचे संकेत दिसत आहेत. विविध प्रमुख सर्वेक्षणांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) बहुमत मिळण्याची शक्य
संग्रहित लोगो


नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.) : केरळ विधानसभा निवडणूक 2026 चे एक्झिट पोल जाहीर झाले असून राज्यात सत्ता परिवर्तनाचे संकेत दिसत आहेत. विविध प्रमुख सर्वेक्षणांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सध्याच्या सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला (एलडीएफ) मोठा फटका बसू शकतो.एकूण 140 सदस्यांच्या केरल विधानसभा निवडणुकीत या अंदाजांनुसार यूडीएफ सत्तेत परतण्याची शक्यता मजबूत झाली आहे. जर हे अंदाज प्रत्यक्ष मतमोजणीतही खरे ठरले, तर राज्यात मोठा राजकीय बदल पाहायला मिळू शकतो.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande