धारणी नगरपंचायतीला मुख्याधिकारी, लेखाधिकारी, बांधकाम अभियंता मिळेना, एक वर्षापासून महत्वाची पदे रिक्त
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)। धारणी नगरपंचायतीमध्ये सध्या मुख्याधिकारी, लेखाधिकारी व बांधकाम अभियंता ही मुख्य पदे मागील एक वर्षापासून रिक्त असल्यामुळे प्रभारी अधिकारी आठवड्यातून एक ते दोन दिवस येऊन महिनाभराची कामे पाहत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामका
धारणी नगरपंचायतीला मुख्याधिकारी, लेखाधिकारी, बांधकाम अभियंता मिळेना एक वर्षापासून महत्वाची पदे रिका


अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)।

धारणी नगरपंचायतीमध्ये सध्या मुख्याधिकारी, लेखाधिकारी व बांधकाम अभियंता ही मुख्य पदे मागील एक वर्षापासून रिक्त असल्यामुळे प्रभारी अधिकारी आठवड्यातून एक ते दोन दिवस येऊन महिनाभराची कामे पाहत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. विविध विकासकामे, आर्थिक व्यवहार तसेच दैनंदिन प्रशासकीय कामांना अडचणी निर्माण होत आहे. याबाबत आता नगरसेवकांसह शहरातीलनागरिकांनी तक्रार आहे.स्थानिक नागरिकांनी तसेच नगरसेवक लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर या पदांवर कायमस्वरूपी लेखाधिकारी, मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केली आहे. धारणी नगरपंचायतीतील पाणीपुरवठा योजनेतील कामे, विविध निधीतील बांधकाम, नियमित टॅक्स वसुली, स्वच्छता, नोकर पगार ही प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जबाबदाऱ्या देण्यात आल्या असल्या तरी कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची गरज आहे. अशातच नगरपंचायतीवर पाणीटंचाईचा वीज भरण्याचा बोजा मोठ्या प्रमाणात असल्याने विद्युत वितरण कंपनीने सुद्धा पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा काढून घेतला आहे. त्यामुळे पाणा टंचाई शहरात भासत आहे. पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी ज्या प्रभागात पाण्याची गरज आहे. त्या ठिकाणी विहिर किंवा बोरवेल अधिग्रहन करण्याची नितांत गरज आहे. परंतु लेखाधिकारी व मुख्याधिकारी नसल्यामुळे हे साधे काम सुद्धा रखडले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande