उत्कृष्ट रिल निर्मात्यांचा अमरावती मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार; मतदान जनजागृतीसाठी तरुणांचा गौरव
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२० च्या अनुषंगाने शहरात व्यापक मतदार जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) विभागामार्फत
उत्कृष्ट रिल निर्मात्यांचा मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार; मतदान जनजागृतीसाठी तरुणांचा गौरव


अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)।

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२० च्या अनुषंगाने शहरात व्यापक मतदार जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांपैकी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेली रिल स्पर्धा ही एक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी संकल्पना ठरली.डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता, सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून या रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील अनेक तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका आणि प्रत्येक मताचे मूल्य यावर आधारित आकर्षक, सर्जनशील आणि संदेशपूर्ण रिल्स तयार केल्या.स्पर्धेत सादर झालेल्या रिल्सपैकी उत्कृष्ट रिल्सची निवड तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आली. निवड प्रक्रियेत संदेशाची परिणामकारकता, सर्जनशीलता, सादरीकरणाची पद्धत आणि जनजागृतीवर होणारा प्रभाव यांचा विचार करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यासाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.या सोहळ्यात मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी तरुणांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजप्रबोधनात योगदान देणे ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे नमूद केले. तसेच प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या स्पर्धेत दीक्षांत हर्षल मनोहरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर कार्तिक काळबांडे यांनी व्दितीय क्रमांक व तनुश्री धीरज कडू यांनी तृतीय क्रमांक मिळविला. जनजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम तसेच शाळा निरीक्षक योगेश पखाले उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशाच नाविन्यपूर्ण स्पर्धांद्वारे अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.या रिल स्पर्धेमुळे शहरातील तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून, लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande