
लातूर, 03 एप्रिल (हिं.स.) : राज्य शासनाने लातूर जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार, लातूरचे विद्यमान जिल्हाधिकारी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार नियमानुसार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून नव्या पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, पदभार स्वीकारल्यानंतर ई-ऑफिस व e-HRMS प्रणालीचा वापर प्रभावीपणे वाढविण्यावर विशेष भर द्यावा. तसेच कार्यभार हस्तांतरणाची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या बदलीमुळे लातूर जिल्ह्यात प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून, नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे कामकाजात गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis