सेवा हमीत बीडचा डंका; आठ लाखांवर अर्जाचा निपटारा
बीड, 30 एप्रिल (हिं.स.)। ''आपली सेवा, आमचे कर्तव्य'' या ब्रीदवाक्याला न्याय देत जिल्हा प्रशासनाने सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्यात आदर्श निर्माण केला आहे. सरत्या आर्थिक वर्षात तब्बल आठ लाखांवर (९१.४०) टक्के अर्जाचा विहित कालावधी
सेवा हमीत बीडचा डंका; आठ लाखांवर अर्जाचा निपटारा


बीड, 30 एप्रिल (हिं.स.)।

'आपली सेवा, आमचे कर्तव्य' या ब्रीदवाक्याला न्याय देत जिल्हा प्रशासनाने सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्यात आदर्श निर्माण केला आहे. सरत्या आर्थिक वर्षात तब्बल आठ लाखांवर (९१.४०) टक्के अर्जाचा विहित कालावधीत निपटारा केल्याबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा मुंबईत राज्यस्तरीय सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात 'सेवा हक्क दिना' निमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल व मुख्य सेवा हक्क आयुक्त

मुंबई विवेक जॉन्सन यांचा राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. जिल्ह्यात एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ८,०७,३२३ अर्ज

प्राप्त झाले. त्यापैकी ७,३७,९६५ अर्जाचा वेळेत निपटारा करण्यात आला.

हा सन्मान म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रशासन यंत्रणेतील विविध घटकांनी केलेल्या कामांना याचे श्रेय द्यावे लागेल. सामान्य नागरिकांना त्यांच्या अर्जावर तत्काळ कार्यवाही करून न्याय देण्याची भूमिका आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande