बीड : जनगणना-२०२७ च्या अनुषंगाने तालुक्यातील पर्यवेक्षक व प्रगणक यांचे पहिले प्रशिक्षण
बीड, 30 एप्रिल (हिं.स.)।तालुक्यातील खोकरमोह जिल्हा परिषद शाळेत जनगणना-२०२७ च्या अनुषंगाने तालुक्यातील पर्यवेक्षक व प्रगणक यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. तालुक्यात २२४ घरयादी गटांसाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर ३७ पर्यवेक्षक कार्
बीड : जनगणना-२०२७ च्या अनुषंगाने तालुक्यातील पर्यवेक्षक व प्रगणक यांचे पहिले प्रशिक्षण


बीड, 30 एप्रिल (हिं.स.)।तालुक्यातील खोकरमोह जिल्हा परिषद शाळेत जनगणना-२०२७ च्या अनुषंगाने तालुक्यातील पर्यवेक्षक व प्रगणक यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले.

तालुक्यात २२४ घरयादी गटांसाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर ३७ पर्यवेक्षक कार्यरत असून अतिरिक्त २३ प्रगणक व चार पर्यवेक्षक राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरी भागासाठी नगरपंचायत मुख्याधिकारी गणेश दहिफळे हे चार्ज अधिकारी असून १७ घरयादी गटांसाठी प्रगणक व ३ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दोन प्रगणक व एक पर्यवेक्षक राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रशिक्षणासाठी प्रा. सुधीर येवले, प्रा. व्ही.एस. जाधव, प्रा. पी. एस. मुळे व प्रा. ए.के. लाहोटी यांची फील्ड ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सर्व नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे. अचूक व संपूर्ण माहिती देऊन शासनाच्या या महत्त्वपूर्ण कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.

जनगणना कक्षाचे काम अशोक जाधव, शिवाजी जाधव, मंडळ अधिकारी निळकंठ सानप, ग्राम महसूल अधिकारी कृष्णा रत्नपारखे व राहुल गोरडे पाहत आहेत. प्रशिक्षण व्यवस्थेसाठी मंडळ अधिकारी शहादेव सानप, ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब बांगर, महसूल सेवक बळिराम काकडे यांनी योगदान दिले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande