हिंगोली जिल्हा परिषदेत सकाळी 7.15 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त होणार ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक 01 मे 2026 रोजी जिल्हा परिषद, हिंगोली येथे सकाळी 7.15 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख
हिंगोली जिल्हा परिषदेत सकाळी 7.15 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त होणार ध्वजारोहण


छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक 01 मे 2026 रोजी जिल्हा परिषद, हिंगोली येथे सकाळी 7.15 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृध्दी दिवाणे यांनी केले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या या गौरवपूर्ण प्रसंगी राष्ट्रीय पोशाख परिधान करून देशभक्तीची भावना व्यक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.05 वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार (दि.01) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.05 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात येणार असून, राष्ट्रगीताच्या सन्मानासह कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, तसेच स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande