
हिंगोली, 30 एप्रिल (हिं.स.)। राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. १ मे, २०२६ रोजी सकाळी ८ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे व्हिजन क्लब उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर ११ वाजता खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर माझं गाव, आरोग्य संपन्न गाव कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी १२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुल समिती येथे बॅडमिंटन हॉल(इमारत) उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव. दुपारी दीड वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis