पंकजा मुंडे शुक्रवारी जालना दौ-यावर
छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)। राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालक
पंकजा मुंडे शुक्रवारी जालना दौ-यावर


छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)। राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री मुंडे यांचे शुक्रवार, दि. 1 मे, 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण व विविध कार्यक्रम तसेच जिल्हा पोलीस दलाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण सोहळयास उपस्थिती. तसेच सकाळी 9.00 ते 10.45 वाजता मोतीबाग चौपाटी (बदनापूर रोड) कडे प्रयाण, दिव्यांग केंद्राचे लोकर्पण स्थळ – जिल्हा रुग्णालय शेजारी. सकाळी 11.00 वाजता अग्रेसन भवन येथे आयोजित “रायझिंग जालना”या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळयास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता दैनिक दिव्य मराठी ग्रुपच्या वतीने आयोजित जालना पोलीस सन्मान सोहळयास उपस्थिती स्थळ हॉटेल अतिथी, मंठा रोड दुपारी 2.15 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande